आअँडर्ट्स  कामर्स कॉलेज कडेपूर येथे क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न

0

कडेगांव दि.23(प्रतिनिधी) : आर्ट्स अँड कामर्स कॉलेज कडेपूर येथे विवेकानंद सप्ताहानिमित्त क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. बापूराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी जिमखाना विभाग प्रमुख प्रा. सौ. अनिता व्हटकर यांनी क्रिडा महोत्सव आयोजित करण्याचा उद्देश सांगितला.

              यावेळी उद्घाटन पर बोलताना प्राचार्य डॉ. बापूराव पवार म्हणाले की, खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. खेळाच्या माध्यमातून तुम्हंचे मैदानाशी नातं घट्ट असेल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी करावी लागणार नाही. तुम्ही दररोज एक तास मैदानावर घालविल्यास फिटनेसही चांगला राहील आणि आरोग्यही चांगले राहील असे प्राचार्य शेवटी म्हणाले.

          यावेळी जिमखाना विभाग प्रमुख प्रा. सौ. अनिता व्हटकर यांनी उपस्थितांना विविध क्रीडाप्रकारांची माहीत देऊन खेळामध्ये खिलाडूवृत्ती किती महत्त्वाचे आहे ते सांगितले. यानंतर नॅक समन्वयक प्रा. दिलीप पवार यांनी नाणेफेक करून क्रिडा महोत्सवला प्रारंभ केला. या क्रीडा महोत्सवामध्ये सांघिक व वैयक्तिक क्रिडाप्रकारांचा समावेश केला असल्याचे सांगून शेवटी प्रा. अनिता व्हटकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी प्रा. दत्तात्रय होनमाने, प्रा. कुमार इंगळे, डॉ. राजेंद्र महानवर, प्रा. दत्तात्रय थोरबोले, प्रा. सौ. आशाराणी हावळे, प्रा.सौ. संगीता पाटील, प्रा. डॉ. अरुणा कांबळे, प्रा. सुरज डुरेपाटील आदि प्राध्यापक, विद्यार्थ्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here