महामार्गावर वळसे येथे दुचाकी दुभाजकावर आदळून युवक ठार.

0

सातारा प्रतिनिधी : पुणे बेंगलोर आशियाई महामार्गवर वळसे (ता.सातारा) गांवच्या हद्दीत दुचाकीने दुभाजकला  दिलेल्या धडकेत एकजण ठार झाला. रोहीत प्रकाश गिंडे (वय 27 ) राहणार कुपवाड रोड मिरज (जि .सांगली) असे ठार झालेल्या युवकाचे नांव आहे. 

      बोरगांव पोलीस ठाणेतुन मिळालेल्या माहिती नुसार मयत रोहीत गिंडे हा दि. 23 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास साताराहुन कराडच्या दिशेने जात असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुभाजकावर जोरदार आदळला या मध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीची  धडक इतकी भीषण होती की रोहित याचा मृतदेह पुर्णपणे महामार्गावर छिन्नविच्छिन्न झाला होता. या अपघात घटनेची नोंद बोरगांव पोलीस ठाणेत झाली असून  पुढील तपास हवा.विजय देसाई करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here