फलटण येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन   

0

फलटण प्रतिनिधी, श्रीकृष्ण सातव :

              केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा फलटण येथे शुक्रवार दि. 27 जानेवारी रोजी भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आल्याची माहिती खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. गडकरी यांच्या माध्यमातून फलटण शहर, तालुका आणि माढा लोकसभा मतदार संघातील विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणण्यात आला आहे. नागरी सत्कार समारंभाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

                         खा. निंबाळकर यांनी सांगितले की गेली अनेक वर्ष दुर्लक्षित असलेला फलटण बारामती या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आपण गडकरी यांना गतवर्षी एक पत्र दिले होते. 55 हजार कोटी रुपयांचा पुणे बेंगलोर महामार्ग फलटण तालुक्यातून जात आहे. या महामार्गाचा ऑनलाइन शुभारंभ यावेळी करण्यात येणार आहे. तसेच दहिवडी ते सांगली या नवीन राष्ट्रीय महामार्गाची घोषणा यावेळी होण्याची शक्यता आहे. फलटण शहरासाठी आपण बाह्यवळण मार्गाची मागणी केली असून त्याचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे उर्वरित कामासाठी निधीची आवश्यकता आहे. त्याची आपण मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच फलटण तालुक्यातील जाणारा पुणे बेंगलोर महामार्ग आहे त्याला जोडणारा 33  किलोमीटरचा जोड रस्ता नाईक  बोंबवाडी येथून करण्यात यावा अशी आपली मागणी आहे. नुकताच या मार्गांचे हवाई सर्वेक्षण करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी फलटण शहर आणि तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून गडकरी यांच्या राजकीय कारकीर्दीस आशीर्वाद द्यावेत   असे आवाहन खा. नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले आहे.

                         लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन आपण करणार आहोत. त्यावेळी नीरा देवधर पाणी प्रश्न,धोम बलकवडी आठमाही पाणी योजना ,नाईक बोमवाडी ता. फलटण येथील औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ  काही लाख कोटी रुपयांचा अशा विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here