सातारा/अनिल वीर : नोंदीत माधाडी कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
येथील मे.अट्राटेक सिमेंट प्रा.लि.द्वारा मे.पी.जी.कणसे यांच्या पवार गोडाऊन जी.३९ जुनी एमआयडीसी येथील माथाडी मंडळाच्या आदेशाचे उल्लंघन करून काम करणाऱ्या नोंदीत माथाडी ११ कामगारांना कमी करण्यात आले आहे.तेव्हा रितसर योग्य ती कार्यवाही करून पूर्ववत कामावर घेण्यात यावे. अशा आशयाची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.