गोंदवले -बनावट शिधापत्रिका बनवणाऱ्यांवर पुरवठा विभागाने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून या पुढील काळात माण तालुक्यातील नागरिकांनी रेशनिंग कार्ड काढण्यासंदर्भात संदर्भामध्ये थेट पुरवठा विभागाशी संपर्क साधावा आवाहन तहसीलदार श्रीशैल्य वट्टी यांनी केले आहे.
मान तहसील कार्यालयामध्ये पत्रकाराशी बोलताना ते पुढे म्हणाले दहिवडी येथील किरण युवराज पवार, दिलीप चव्हाण, सुरेश चव्हाण तिघेही राहणार दहिवडी तालुका मान यांच्याकडून सूर्यकांत उर्फ पप्पू बाळासाहेब आवटे राहणार दहिवडी या संशयित आरोपीने प्रत्येकी 3300 घेऊन केसरी शिधापत्रिका बनवून दिली होती. या शिधापत्रिकेवर तत्कालीन तहसीलदार बाई माने यांची बनावट सही करून तहसीलदार मान यांचा बनावट शिक्का मारून गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले. नंतर माण तालुका पुरवठा विभागाचे अतिरिक्त पुरवठा निरीक्षक राहुल जाधव यांनी सदर प्रकरणाची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सूर्यकांत उर्फ पप्पू बाळासाहेब आवटे या संशयित आरोपीस गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
माण तालुक्यातील नागरिकांनी रेशनिंग कार्ड च्या संदर्भामध्ये कार्ड काढणे किंवा रेशनिंग कार्ड मध्ये नाव वाढवणे कमी करणे यासंदर्भामध्ये पुरवठा विभागाशी संपर्क साधावा किंवा आपल्या गावातील रेशनिंग दुकानदाराशी संपर्क साधून रेशनिंग कार्ड काढण्यासाठी माहिती घ्यावी नागरिकांनी तहसील आवारातील इतर कोणत्याही खासगी दलालाशी संपर्क साधू नये असे आवाहन तहसीलदार श्रीशैल्य वट्टी यांनी केले आहे.