महाविद्यालयात भारतीय संविधानाच्या एक-एक कलमाचे रोज वाचन व्हावे : शरद शेजवळ 

0

अध्यापकभारतीची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

येवला (प्रतिनिधी)

        भारतीयांचा धर्मग्रंथ भारतीय संविधानाची ओळख,महत्व,हक्क अधिकारा बरोबरच कर्तव्य जाणीव बाल वयापासून अर्थात विद्यार्थीदसे पासूनच शाळा महाविद्यालयातुन विद्यार्थ्यांना होणे गरजेचे असून त्या करिता परिपाठ (मूल्य शिक्षण) तासिकेत विद्यार्थ्यांच्या सामुदायिक संविधान उद्देशिका (प्रास्ताविका) वाचना सोबत शाळा-महाविद्यालयात भारतीय संविधानाच्या एक-एक कलमाचे प्रजासत्ताक दिनापासून रोज वाचन व्हावे अशी मागणी राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक शिक्षण प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीचे संस्थापक तथा अखिल भारतीय संविधान साक्षरता अभियानचे निमंत्रक शरद शेजवळ यांनी पत्रकाद्वारे शासनास केली आहे.

प्रमुख मागण्या : 

१) शाळा-महाविद्यालयात भारतीय संविधानाच्या एक कलमाची रोज वाचन करण्यात यावे.

२)भारतीय संविधान हा स्वतंत्र विषय (नागरिकशास्त्र सोबत) विद्यार्थी शैक्षणिक वयोगटाप्रमाणे शिकविला जावा.

३) भारतीय संविधान ह्या विषयावर दर तीन माही सामान्य ज्ञान परीक्षा (वयोगटाप्रमाणे) घेण्यात याव्यात.

४) शाळा महाविद्यालयांच्या भारतीय संविधानिक मूल्य विचार प्रसार करण्यासाठी विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे.

५) भारतीय संविधान विषयावर शाळा महाविद्यालय स्तरावर परिसंवाद,व्याख्यान,चर्चासत्र,निबंध,वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात यावे.

    केंद्र व राज्य सरकारने विद्यार्थी व राष्ट्रहित लक्षात घेऊन सदर मागणीचा गंभीरपणे विचार करून उचित कार्यवाही करावी अशी मागणी शरद शेजवळ, वनिता सरोदे, एस.एन.वाघ,प्रा.नितीन केवटे,प्रा.के.एस.केवट,महेंद्र गायकवाड,इंजि.अक्षय गांगुर्डे, अभय लोखंडे, प्रशिल शेजवळ आदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here