सातारा : प्रजासत्ताक दिनी गुरुवार दि.२६ जानेवारी २०२३ रोजी येथील राजवाडा गांधी मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ वाजता संविधान पोस्टर प्रदर्शन सुरू होणार आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रेक्षक व नागरिकांसाठी खुले राहील. सदर ठिकाणी इडा पिडा टळो बळीचे राज्य हे पथनाट्य सादर केले जाईल. सात वाजता भव्य पडद्यावर प्रेक्षकांसाठी संविधान चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.तेव्हा सातारा शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आणि महाविद्यालय, शाळा आणि सामाजिक कार्यकर्ते, संघटना यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.असे आवाहन आयोजकातर्फे संविधान लोकजागर परिषदेचे अध्यक्ष भगवान अवघडे यांनी केले आहे.
याकामी जि.प. समाजकल्याण बाळासाहेब शिरसट, अंनिसचे प्रकाश खटावकर,संविधान लोकजागर पतिषदेचे संघटकअनिल वीर, सचिव माणिक आढाव,उपाध्यक्ष दिलीप भोसले,अंनिसचे प्रशांत पोतदार,परवेज सय्यद,राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष हौसेराव धुमाळ व तत्सम संघटनांचे प्रतिनिधी अथक असे परिश्रम घेत आहेत.