पैठण,दिं.२९: पैठण शहरातील रामनगर येथील ओम साईराम नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.मनोरंजक कार्यक्रमापेक्षा आदर्श व संस्कारक्षम कार्यक्रम ठेवण्याकडे मंडळाचा विशेष भर कायमच असतो.
गुरूवार दिं.२९ रोजी शिवशाहीर कल्याणजी महाराज काळे यांचा भव्य असा छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची शौर्यगाथा वर्णन करणारा पोवाड्याचा आणि लोकरंजनातुन प्रबोधनपर कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शिवशाहीर कल्याण काळे यांनी
गाथा शिवरायांच्या शौर्याची पोवाडा सादर करताना सांगितले की देशावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र मदतीला धावला.शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे यादैवतामुळे महाराष्ट्र धर्माचे व प्रजेचे रक्षण झाले. यामध्ये जाधव ,भोसले घराण्याचा इतिहास आपल्या ओघवत्या भाषेत सांगितला.यावेळी उपस्थित युवकासह महिला, पुरूष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सदरील कार्यक्रमाचे सौजन्य मा. नगरसेवक बाळासाहेब माने यांनी केले होते यावेळी ओमसाई नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष अँड राजेंद्र गोर्डे पाटील ,सचिव सोमनाथ शिंदे,मा.नगराध्यक्ष दत्ताभाऊ गोर्डे,सुर्यकांत धुपे, कल्याण सोनवणे,विजय मुळे,प्रकाश पानगे ,मनोहर नवले , सदाशिव उगले,सुधीर आनंदकर,गणेश थोटे,संदीप धोकटे,चंद्रकांत झारगड,संदिप जाधव,दिपक गायकवाड, भास्कर कुलकर्णी,सुधाकर पगार, प्रभाकर पाटील, ममताराम करे,सुरेश कवले,श्रीकांत दौंड, योगेश धुपे आदी ओम साईराम नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किरण गाडेकर यांनी केले.