उरण दि 27(विठ्ठल ममताबादे )भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित अश्या आदिवासी समाजासाठी संविधनामधे केलेल्या तरतुदींना भ्रष्ट अधिकारी आणि महसूल मंत्री यांनी हरताळ फासला आदिवासी खातेदार गोपाळ लहण्या कातकरी यांची मोजे दिघोडे तालुका उरण येथील पाच एकर जमीनीच्या सात बारा सदरी वारस म्हणून आगरी समाजातील घरत कुटुंबीयांची नावे.
मौजे दिघोडे तालुका उरण येथील सर्व्हे नंबर 94/8 आणि 100/1 ही पाच एकर जमिनीच्या सात बारा सदरी गोपाळ लहाण्या कातकरी ह्या आदिवासी व्यक्तीची नोंद होती. त्याच्या मृत्यू नंतर महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांनी घरत कुटुंबीयांशी संगनमत करून चुकीच्या पद्धतीने वारस म्हणून घरत कुटुंबीयांची नावे सात बारा सदारी दाखल केली. कातकरी आडनाव असलेल्या आदिवासी व्यक्ती चे वारस म्हणून आगरी समाजातील घरत आडनाव असलेल्या व्यक्तीची वारस म्हणून कशी नोंद होवू शकते ? हा मूळ मुद्दा आहे.मा.कोंकण विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी रायगड डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी आणि तहसीलदार उरण यांनी सदर नोंद चुकीच्या पद्धतीने झाल्याने सदर फेरफार रद्द करण्यात यावा असा स्पष्ट अहवाल दिलेला असूनही उप विभागीय अधिकारी पनवेल आणि महसूल मंत्री यांनी आदिवासी महिलेवर अन्याय कारक निर्णय दिलेला आहे. त्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी प्रांत अधिकारी कार्यालय पनवेल येथे मुक्ता कातकरी ही आमरण उपोषणाला बसली आहे. अनेक संघटना हे उपोषण स्थळी येवून सदर उपोषणास पाठिंबा देत आहेत.