सातारा/अनिल वीर : बाल विकास प्रकल्पाधिकारी तथा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जावलीचे संदीप रमेश भिंगारे यांची सखोल चौकशी करून बडतर्फ करावे.अन्यथा,१६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
जावली तालुक्यातील अंगणवाडी सेविकेच्या विरोधार्थ तक्रारी अर्जाचा पाठपुरावा करूनही कोणतीच कारवाई झाली नाही.अंगणवाडी घोटाळाप्रकरणी संबंधीत सर्व अधिकारी यांची चौकशी होणे गरजेचे आहे.मोठा घोटाळा झाल्याने योग्य ती उत्तरे मिळत नाहीत.तेव्हा वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा.अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षा पूजा बनसोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात उल्लेख केला आहे.सदरच्या निवेदनावर उषा गायकवाड,अमृता मोरे,रोहन मोरे व आदित्य बनसोडे यांच्या स्वाक्षरी आहेत.