हा सत्यजित तुमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात सोबत – सत्यजित तांबे

0

संगमनेर : राज्यात जुन्या पेन्शन योजनेसह शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदानीतचे प्रश्न, कंत्राटी पद्धती, नवीन नोकरी भरती असे अनेक प्रलंबित प्रश्न बाकी आहेत.हे सर्व प्रश्न आव्हान म्हणून प्राधान्याने सोडवणार असून हा सत्यजित तुमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात सोबत असेल असा ठाम विश्वास युवा उमेदवार सत्यजित तांबे यांनी दिला.

           जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर, राहाता, राहुरी येथील मतदारांशी व नागरिकांशी संवाद साधताना सत्यजित तांबे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यात विविध खात्यांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. परंतु सरकार नवीन नोकर भरती करण्यासाठी उदासीन आहे.यात सर्वात महत्त्वाची म्हणजे जिल्हा परिषद व माध्यमिक शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत.याचा थेट परिणाम राज्यातील गुणवत्तेवर होत आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध विषयांच्या करिता स्वतंत्र शिक्षकांसह नव्याने भरती होणे गरजेचे आहे. अनेक पात्र उमेदवार प्रतीक्षेत आहेत. मात्र त्यांना नोकरीची संधी मिळत नाही.राज्याच्या  विविध विभागात असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत तसेच शिक्षण व आरोग्य हे शासनाने मोफत व गुणवत्तेने सर्वांना पुरवले पाहिजे शासनाचा जीडीपीनुसार सात टक्के खर्च शिक्षणावर होणे अपेक्षित आहे मात्र सध्या तो फक्त अडीच टक्केच होत आहे यामुळे गुणवत्ता ढासळत आहे.कृषी व्यवसायात नवीन संधी निर्माण करताना शेतीला व्यवसाय म्हणून नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या तर तरुणांचा ओढा त्याकडे निर्माण होईल याचबरोबर पिकांसाठी हमीभाव अद्याप ठरलेला नाही .तो हमीभाव निश्चित करण्यासाठीही आपण पाठपुरावा करणार आहोत.

प्रचार सभांना उस्फूर्त प्रतिसाद
अमोघ वकृत्व लाभलेले सत्यजित  तांबे यांची विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी, प्रश्नांची सोडवणूक करण्याची पद्धत, याचबरोबर प्रत्येकाशी जिव्हाळ्याचा थेट संबंध यामुळे पाचही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सत्यजित तांबे यांच्या प्रचार दौऱ्यांना पदवीधरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here