अहमदनगर:- महाविद्यालयीन शिक्षण घेणारी विद्यार्थिनी समाजातील एक घटक आहे. आपण समाजाचे काही देणेलागतो या भावनेने समाजसेवा करावी, विद्यार्थिनींनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक संवेदना जपावी व आपल्या हातून ग्राम परिवर्तनासाठी हातभार लागावा असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्था, जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य इंजिनिअर अनिल साळुंके यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या उपक्रमा अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मांजरसुंबा गावच्या सरपंच श्रीमती मंगल कदम उपसरपंच जालिंदर कदम उपप्राचार्य डॉ. भास्कर निफाडे कार्यालयीन प्रमुख डी.के.माने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर थोपटे यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये श्रम संस्कार शिबिरामधून विद्यार्थिनीवर श्रम संस्कार होतात त्यांच्यामध्ये समूह संघटन, स्वयंशिस्त, जबाबदारीची जाणीव, नेतृत्वगुण निर्माण होतात या सात दिवसांमध्ये या शिबिरात वेगवेगळे उपक्रम बेटी बचाव बेटी पढाव, रस्ता सुरक्षा सप्ताह जनजागृती, नव मतदार जनजागृती, वृक्षसंवर्धन, वृक्षारोपण,गटचर्चा या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास होतो व भावी जीवनामध्ये त्याचा उपयोग होतो असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.भूपेंद्र निकाळजे यांनी केले कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाधिकारी डॉ.मंजुश्री भागवत यांनी केले याप्रसंगी प्रा.रिजवान खान प्रा.चंद्रकांत देसाई प्रा. विष्णू अडसरे डॉ. निर्मला दरेकर डॉ.लक्ष्मी कातवटे डॉ. फातेमा आंबेकर प्रा. एस. एस. आबक उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रूपाली एंडाईत यांनी केले.