*परीपाठ/पंचाग/दिनविशेष *

0
सौ. सविता देशमुख , उपशिक्षिका ,पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर*

❂ दिनांक :~ 04 फेब्रुवारी 2023 ❂ वार ~ शनिवार

      *🏮 आजचे पंचाग 🏮*
━═•●◆❃★❂★❃◆●•═━

माघ. 04 फेब्रुवारी
तिथी : शु. चतुर्दशी (शनि)
नक्षत्र : पुनर्वसु,
योग :- प्रीती
करण : गर
सूर्योदय : 06:53, सूर्यास्त : 05:55,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖋 सुविचार 🖋
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

💡स्वतःवरच तुफान प्रेम करणाऱ्या माणसाला शत्रू नसतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
⚜म्हणी व अर्थ ⚜

📌केळीवर नारळी अन् घर चंद्रमोळी.

🔍अर्थ:-
अत्यंत गरीब परिस्थिति असणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆

🌎जागतिक कर्करोग दिन

🌞या वर्षातील🌞 35 वा दिवस आहे.

*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

👉१६७०: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी ‘गड आला पण सिंह गेला ‘ असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.
👉१७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.
👉१९२२: चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.
👉१९३६: कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.
👉१९४४: ’चलो दिल्ली’चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच
👉१९४८: श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
👉१९६१: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान

*🌹जन्मदिवस / जयंती🌹*

👉१८९३: चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक
👉१९०२: चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक. १९२७ मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या ५,८०० किलोमीटरच्या विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धेत भाग घेऊन साडे तेहतीस तासांत ती स्पर्धा जिंकली. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या ’द स्पिरीट ऑफ सेंट लुईस’ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९७४)
👉१९२२: स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – शास्त्रीय गायक (मृत्यू: २४ जानेवारी २०११)
👉१९३८: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू पं. बिरजू महाराज यांचा जन्म.
👉१९७४: उर्मिला मातोंडकर – चित्रपट अभिनेत्री

  *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

👉१६७०: नरवीर तानाजी मालुसरे (जन्म: ? ? ????)
👉१८९४: अ‍ॅडोल्फ सॅक्स – सॅक्सोफोन या वाद्याचे जनक (जन्म: ६ नोव्हेंबर १८१४)
👉१९७४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १ जानेवारी १८९४)
👉२००१: पंकज रॉय – क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: ३१ मे १९२८)
👉२००२: भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (जन्म: १ ऑगस्ट १९१३)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

👉भारतीय नियोजन मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण होते?
🥇पंडीत जवाहरलाल नेहरू

👉आहाराचे मोजमाप करणारे एकक कोणते?
🥇कॅलरी

👉भारतीय संस्कृती मधील एकूण वर्ण किती आहेत?
🥇चार वर्ण ( ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र )

👉चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे?
🥇ओरिसा

👉जगातील सर्वात मोठी नदी कोनती आहे?
🥇अमेझाँन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🕸 बोधकथा 🕸

⌚हातातिल घड्याळ⌚

एकदा एका शेतकऱ्याला जाणवले की त्याचे हातातील घड्याळ धान्याच्या कोठारात हरवले आहे.
जरी ते एक सामान्य घड्याळ होते तरी त्याचे लेखी त्याला अफाट भावनिक मूल्य होते.
बराच वेळ गवतात सर्वत्र शोधल्यावरही त्याला ते सापडेना. मग त्यांनी कोठाराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांच्या गटाला घड्याळ शोधण्यासाठी बोलावले व त्यांनी त्या मुलांना वचन दिले की जो कोण त्याचे घड्याळ शोधून देईल, त्याला बक्षिस मिळेल….
बक्षिस मिळेल, हे ऐकून सगळी मुले कोठारात लगबगीने गेली, गवताच्या चारी बाजूने शोधायला लागली पण त्यांना घड्याळ कुठेही सापडेना.
नेमके जेंव्हा त्या शेतकर्याने घड्याळाचा शोध घेण्याचे थांबवायचे ठरवले तेव्हा एक मुलगा त्याच्या जवळ जाऊन शेतकर्याकडे घड्याळ शोधण्याची एक संधी मागू लागला.
शेतकरी त्याच्याकडे बघून विचार करू लागला की “बिघडले कुठे…!
हा मुलगा प्रामाणिक दिसतोय. देऊ या त्याला एक संधी…….
शेतकर्याने त्या छोट्या मुलाला घड्याळाचा शोध घेण्यासाठी कोठारात पाठवले.
थोड्याच वेळात तो मुलगा हातात घड्याळ घेऊन नाचत नाचतच बाहेर आला.
शेतकऱ्याला आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले………!
त्याने त्या मुलाला विचारले की जिथे बाकीच्यांना अपयश आले, तिथे त्याला हे यश कसे काय प्राप्त झाले………!!
मुलगा म्हणाला, “मी काहीच नाही केलं, पण जमिनीवर शांत बसून राहिलो आणि ऐकू लागलो. त्या शांततेत मला घड्याळाची टिक-टिक ऐकू आली आणि मी त्या दिशेने शोधू लागलो.”

एक शांत मन त्रासलेल्या मनापेक्षा चांगलं विचार करू शकते.
तुमच्या मनाला रोज काही क्षणांसाठी तरी शांतता द्या आणि मग पहा,
तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचे मन
तीक्ष्णपणाने काम करून
तुमचं जीवन कसे सजवते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. देशमुख. एस. बी,
🌻सचिव🌻
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ
📱7972808064📱 मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर

▪️सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,
▪️सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे

सौ. सविता देशमुख, उप शिक्षिका .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here