जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील साकत येथील कडभनवाडी शिवारत काल दुपारी १ वाजाता लागलेल्या आगीत ३ ते ४ एकर ऊस जळून खाक झाला शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. जीवीत हानी झाली नाही. मात्र शेतात सरपटणाऱ्या प्राण्याची प्राण हानी झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील शतकऱ्यानी हातात सापडेल त्या वस्तूने आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली. वेळीच आग आगीवर नियंत्रण मिळविल्याने शेजारील अनेक शेतकऱ्यांचा ऊस आगी पासून वाचवण्यात यश आले.
सुगीचे दिवस असल्याने शेतकरी शेतात होते आग लागल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने प्रत्येक शेतकरी आगीच्या दिशेने धावत सुटले व आग आटोक्यात आणण्यासाठी ज्याने त्याने आप-आपल्या परीने प्रयत्न केला.
शाहदेव मारुती कडभणे, मच्छीद्र मारुती कडभणे,अरुण पाराजी नेमाने,जालिंदर भाऊसाहेब नेमाने, या शेतकऱ्यांचा आगीत ऊस जळाला तर . ग्रा.पं. सदस्य सचिन नेमाने,बाळू नेमाने, प्रशांत बेद्रे, सचिन नेमाने, पवन कदम,रमेश नेमाने,बाबासाहेब कडभणे,रवींद्र नेमाने,नाना नेमाने,नितीन नेमाने,दत्त वराट, विकास नेमाने, माऊली कदम,रामभाऊ वराट,सुनीता कडभाणे,लताबाई कडभाणे, महिलांनीही आपापल्या परीने आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले
शेतातून गेलेल्या विद्युत वहिनीला शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. आ लागल्याचे कळताच साहाय्यक विद्युत अभियंता हिरामन गावीत, वायरमन फाळके यांनी घटना स्थळाला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली