हळदी कुंकू या पारंपारिक कार्यक्रमाला दिली आधुनिकतेची जोड.
उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील खोपटे येथे बांधपाडा महिला बचत गट तर्फे तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण यावर जनजागृती करण्यात आली.
खोपटे गावातील बांधपाडा महिला बचत गटातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले. महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले. स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संगीत खुर्ची,फुगड्या, पारंपरिक नाच आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी बांधपाड्यातील अनेक महिलांची उपस्थिती राहिली. मेळावा यशस्वी करण्यासाठी महिला सामाजिक कार्यकर्त्या पूनम पाटेकर तसेच खोपटे गावाची प्रथम नागरिक सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.