उरण दि 11(विठ्ठल ममताबादे )
सध्याच्या घडीला जिल्हा परिषद शाळेकडे दुर्लक्ष होताना आपण पाहिलंय पण जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक गरीब विद्यार्थी शिक्षण घेत असतात.त्यामुळे नवघर जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीसाठी आर्थिक मदतीची गरज ओळखून रायगड जिल्ह्यातील दानशूर व्यक्तिमत्व, गोरगरिबांचे कैवारी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष,कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी पुढाकार घेत आपल्या यमुना शैक्षणिक, सामाजिक संस्था शेलघरच्या वतीने 1 लाख रुपयाची आर्थिक मदत नवघर ग्रामस्थांना दिली आहे.त्याबद्दल सर्व नवघर ग्रामस्थ व समाजातील सर्व स्तरातून यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर व रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे कौतुक होत आहे.