सिमाशुल्क विभागाच्या सी.आय.यु.ची कारवाई
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )आशिया खंडातील प्रसिद्ध बंदर जेएनपीए(जेएनपीटी )मधून दुबईतील जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात आलेल्या संशयित कंटेनरमधून अडीच कोटींचे तीन मेट्रीक टन रक्तचंदन जेएनपीटी सीमा शुल्क विभागाच्या सी.आय.यू. ने जप्त केले आहे.जेएनपीए बंदरातून दुबईत निर्यात करण्यात आलेल्या मालाच्या कंटेनर बाबत सिमा शुल्क विभागाला संशय होता. त्यामुळे केंद्रीय गुन्हे पथकाने हा कंटेनर परत मागविला होता. या दुबईतून परत मागविण्यात आलेल्या कंटेनरची तपासणी करण्यात आली.
त्यामध्ये निर्यात करण्यात आलेला सुमारे तीन मेट्रिक टन रक्तचंदन आढळले आहे. दोन आठवड्यापूर्वी उरण परिसरातील गोदामातून अशाच प्रकारे सुमारे तीन मेट्रिक टन रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करीत असतांना समोर आलेल्या माहिती वरून सीमा शुल्क विभागाने हा निर्यात झालेला संशयित कंटेनर परत मागविला होता.या कंटेनरमध्ये हे तस्करी करण्यात आलेले रक्तचंदन सिमाशुल्क विभागाच्या सी.आय.यू. कडून जप्त करण्यात आले आहे.