सातारा /अनिल वीर : धनशक्तीला रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघशक्ती जागृत करणे गरजेचे आहे.असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक सभागृह,कोरेगाव येथे पूर्व जिल्हा रिपब्लिकन सेनेची सहविचार सभा संपन्न झाली. तेव्हा खंडाईत मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मोहड होते. यावेळी पुर्व जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, जिल्हा कोषाध्यक्ष दिनकर जगताप, जिल्हा संघटक रामचंद्र गायकवाड, जिल्हा सदस्य व तडवळे गावचे विद्यमान सरपंच नानासाहेब बडेकर यांची प्रमूख उपस्थिती होती.
चंद्रकांत खंडाईत म्हणाले, “रिपब्लीकन सेनेच्या पदाधिकारी यांनी तालुका गट आणी गण यामध्ये समाजासमाजामध्ये जाऊन धनशक्ती आणी पारंपारीक सत्तेतील मक्तेदारी रोखण्यासाठी छोट्या छोट्या जात समूहातील पारंपारीक मानसिकतेला झुगारून परीवर्तनासाठीची त्यांच्यातील सुप्त इच्छाशक्ती जागरूत करून त्याच्यात संघशक्ती वाढवुन मताधिकाराची जाणीव निर्माण करावी.कार्यकर्त्यांनी सतत चर्चा – बैठका घेऊन जनजागृती करून रिपब्लीकन सेनेची जनशक्ती वाढवली तरच आपणास सत्तेत जाता येईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटना वाढीसाठी काम करने गरजेचे आहे.”
सुभाषराव गायकवाड म्हणाले, “शासनाने सर्वसामान्य जनतेला विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी अनेक योजनांचा भुलभूलैया एकाबाजूला आणला आहे.पण,त्याचा विनीयोग करता येयु नये. अशा नियम व अटी घतल्याने त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर जनतेला होताना दिसत नाही. या बाबत जनतेत उठाव निर्माण करून पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी काम करणे गरजेचे आहे.”
अध्यक्षस्थानावरून बोलताना भाऊसाहेब मोहड म्हणाले,”संकटकाळी संघटनेकडे धाव घेऊन चालणार नाही. सातत्याने पक्ष बांधणीसाठी कार्यरत राहिले पाहीजे. स्थानिक स्वराज्य संस्थांत चंचुप्रवेश करण्यासाठी आपसपसातील मतभेद दूर केले पाहिजेत.”
यावेळी रिपब्लीकन सेनेच्या वाढीसाठी लवकरच कोरेगाव तालूक्यात पुर्व सातारा जिल्ह्याचा कार्यकर्ता मेळावा घेऊन कार्यकर्त्यामध्ये जोश निर्माण करून सभासद मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे.
यावेळी सर्व तालुका पदाधिकारी यांना नियूक्तीची पत्रे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब आवाडे, शांताराम आवडे,सुधाकर जगताप,विनोद खंडाईत,सुरेंद्र यवले,महासचिव विजयराव मोरे, सहसचीव सुनील बडेकर,संजयजी मुळीक, शंकरराव खंडाईत,कोषाध्यक्ष संपतराव बुधावले,सहकोषाध्यक्ष दगडू नानासोा. मोरे,शामरावजी गवळे,सल्लागार लक्ष्मणराव वाघमारे,जयशिंगराव माने,अनिल कांबळे, संघटक दगडू दादा मोरे,रवींद्र उबाळे,चंद्रकांत कांबळे,सदस्य अरूण माने, प्रकाश यादव,संतोष कुडवे आदी पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते. महासचीव विजयराव मोरे यांनी आभारप्रदर्शन केले.