कोपरगाव (प्रतिनिधी)
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांतील इयत्ता दहावी मधील विदयार्थीचा निरोप तथा सदीच्छा समारंभ मोठा उत्साहाने संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जगदंबा बी.एड.कॉलेजचे प्राचार्य दादासाहेब मोरे हे उपस्थित होते. अमेरीकेत असलेले माजी विदयार्थी सचिन भाबड,दीलीप तुपसैंदर देखिलया प्रसंगी उपस्थित होते. या प्रसंगी दहावीतील विद्यार्थी कु.आरती म्हस्के,कु.सिध्दी चव्हाण,वैष्णवी नागुडे,रामेश्वर निंबाळकर,सार्थक वाघ,ओंकार कुहीटे आदि विदयार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले.
विदयार्थीनी पुढील वाटचालीत डॉक्टर कींवा इंजिनिअर होण्यापेक्षा उद्योजक बनावे. आपले व्यक्तीमत्व विकसित करुन उत्तम नागरीक व्हावे आणि देशसेवा करावी असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी केले.सध्याची सामाजिक स्तरावरील परीस्थिती लक्षात घेवुन विदयार्थीनी आपले मित्रा बरोबरची मैत्री पारखुन घ्यावी व पुढील वाटचाल करावी असे मत संस्थेचे सचिव दीलीप अजमेरे यांनी मांडले. माजी विदयार्थी सचिन भाबड यांच्या वतीने विदयार्थीना रायटींग पॅडचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी विदयालयांचे आदरस्थान कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्याला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.डी.गोरे तर आभार पर्यवेक्षिका उमा रायते यांनी मानले.
यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे ,सदस्य संदीप अजमेरे,राजेश ठोळे आदीनी विदयार्थीना एस.एस.सी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला शिक्षक वृंद व विदयार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.