बेरंग …
आली रे धुलीवंदन
उधळीत विविध रंग
खेळता विसरी सारे
होती उन्मादात दंग
कुणीकरी नशापाणी
कुणा आवडते भांग
कुणी विसरूनि वैर
नाचती बनूनि मलंग
जपून वापरा पाणी
होऊ नये रंगाचा भंग
पावित्र्य जप सणाचे
आठवा गोपी श्रीरंग
अंगचटीले येई कुणी
विखारी विषारी भृंग
उत्सव हा उत्साहाचा
नको रे मनाला व्यंग
करी होळीचाबहाणा
पण गलिच्छ अंतरंग
निर्मळ संस्कृती वरी
उठावे दोस्तीचे तरंग
सण आनंदाचा क्षण
आनंदे भरावे विहंग
गालबोट ना लागावे
असाचं हवा सत्संग
2
नैसर्गिक होळी ..
करुन वृक्ष संवर्धन
पांग फेडू नैसर्गिक
साजरी करू होळी
रे वेगळी सांकेतिक
तोडती मला कुणी
झाडे होई अगतीक
पर्यावरणा खेळाया
अधिकार न नैतिक
शिव्या ऐवजी उधळू
विचार धन मौक्तीक
चेष्टा मस्करी असह्य
युध्द भडके शाब्दिक
रंग खेळता निमित्ते
चाळे नको अनैतिक
असूरी वृत्ती प्रदर्शन
का घडावे विकृतिक
बदलू जरा करूनिया
कार्यक्रम सांस्कृतिक
हवामान बदल सुरू
भेद कळो प्राकृतिक
हिंदू सणा सार्थ अर्थ
महत्ववाढे जागतिक
नाविन्य कास धरावी
होऊ सभ्य प्रगतिक
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.