जनसंपर्क अधिकारी प्रा. संजू चव्हाण यांचा दुबई येथे नॅशनल मीडिया रिलेशन्स पुरस्काराने सन्मान

0

लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे

 पुणे – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेचे जनसंपर्क अधिकारी आणि मुक्त पत्रकार प्रा. संजू चव्हाण यांना दुबई येथे ‘नॅशनल मिडीया रिलेशन्स अवार्ड ‘देऊन नुकतेच प्रमुख पाहुणे एस.के.ग्रुप्सचे प्रमुख सचिन चव्हाण, दुबई येथील ड्रीम डिझाईनचे संचालक कार्तिक  दुर्वासुला यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन दुबई येथील एस के ग्रुप, ए एन पी ग्रुप ऑफ दुबई आणि पुण्यातील स्वयंदीप फाऊंडेशनच्यावतीने दुबई येथे दरवर्षी अशा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते आणि राज्यातील विविध मान्यवरांना हा पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात येते. गेल्या चार वर्षांपासून पुण्यातील अधिकारी व विचारवंत  डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम दरवर्षी दुबईत घेण्यात येतो. यावर्षी हा सोहळा ६ मार्च रोजी दुबई येथील पंचतारांकित मीडिया रोटाना या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास ३० जणांचा सन्मान करण्यात आला. या वर्षी हा अवॉर्ड सोहळा  ए.एन.पी.ग्रुप्स, एस.के.ग्रुप्स,पुणे  व स्वयंदीप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस.के.ग्रुप्सचे प्रमुख सचिन चव्हाण, दुबई येथील  ड्रीम डिझाईनचे संचालक  कार्तिक  दुर्वासुला, मिनाझ फईम, यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र रोकडे व राहुल भातकुले हे उपस्थित होते. दुबई येथे हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रा. संजू चव्हाण हे सध्या एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य करत आहेत. त्यांचा राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर मोठा जनसंपर्क आहे, याची दखल घेत त्यांना नुकतेच नॅशनल मिडीया रिलेशन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळ्याबद्दल प्रा. संजू चव्हाण म्हणाले, की माध्यम आणि जनसंपर्क क्षेत्रात करत असलेल्या कार्याचा हा गौरव आहे. या पुरस्कारने नवीन संधी आणि जोमाने कार्य करण्याची ताकद मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here