उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे )अभिनव मित्र मंडळ आयोजित स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमाला चिरनेर मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिरनेर राम मंदिरासमोर मोहन फुंडेकर यांच्या कार्यक्रमात सरपंच संतोष चिर्लेकर, महामुंबई चे संपादक मिलिंद खारपाटील, पत्रकार नंदकुमार तांडेल, दर्शना माळी, तृप्ती भोईर, आदर्श शिक्षिका शारदा खारपाटील ,आई माऊली बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा दर्शना भोईर ,सदस्या मयुरी अहिरे, वनिता पाटील , अभिनव मित्रमंडळ चे कार्याध्यक्ष पद्माकर फोफेरकर, अध्यक्ष सुनील नारंगीकर आणि संगीतप्रेमी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवरात्रोत्सव निमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.एकच राजा इथे जन्मला , जय जय महाराष्ट्र माझा अशी एकापेक्षा एक सुरेल आणि चढ्या आवाजातील गाणी वन्स मोअर ची मागणी मिळवत होती. प्रत्येक गाण्यानंतर टाळ्यांचा जोरदार कडकडाट होत होता. 2 तास रसिक श्रोत्यांना अक्षरशः खुर्चीस खिळवून ठेवले होते.महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र भगत यांनी अतिशय उत्तम रित्या केले.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभिनव मित्रमंडळाच्या सर्व सदस्यानी विशेष मेहनत घेतली.