यशवंतराव चव्हाण /कै. यशवंतराव ..

0

यशवंतराव चव्हाण 

कृषीक्रांतीचे प्रणेते

जनतेचे  ते  लाडके

आगळे  वेगळे  नेते

तळागाळाशी  तया

जोडली  नाळ नाते

म्हणूनचं मुख्यमंत्री

पहिले  वहिले  होते

शेतकरी अर्थसक्षम

स्वप्न अर्थपूर्ण पुरते

दूरगामी द्रृष्टे धोरण

उद्योग चाक फिरते

कोल्हापूर बंधारे ते

कृतज्ञ गाथा सांगते

समृद्ध होई योजना

तेव्हांचे बाळ  रांगते

सकस बनली भूमी

पांढरे सोने  पिकते

सहकार सहकार्येत

धान्य सुलभ विकते

पथदर्शी पाऊलांना

शिर  सलाम  करते

आठवणीत त्यांच्या

डोळ्यांत येते भरते

समतोलविकासाचे

सक्षम  प्रखर प्रणेते

ने नंतर नेते जाणते

आधी  माणूस  होते

 

 

2)

कै. यशवंतराव ..

आपले  यशवंत राव

मुख्यमंत्री सार्थ खरा

सत्ता देवी  वश सदा

स्वतःचं मारी चकरा

महाराष्ट्र धान्यसंपन्न

स्वप्न आले  साकारा

सिंचन  प्रकल्प भले

किती आणे आकारा

शिस्तबद्ध कार्य केले

विरोधीकरे जयकारा

रयतेच्या जवळचे  ते

लांब ठेवले अहंकारा

शेतकरी अर्थ  सक्षम

लाडका भलता नारा

जाणती दुखणे  कुठे

कारभार असे  न्यारा

अहोरात्र  चिंता करी

भटकेविमुक्त उध्दारा

साक्ष दे कल्पकतेची

तो कोल्हापूर बंधारा

सहयोगी सहजयोगी

बळ दिधले सहकारा

वाव नसे भावही नसे

मुळी  भ्रष्ट  कारभारा

साहित्यसंपदा अद्भुत

आकर दिला  विचारा

बहुगुणी माणूस कसा

बा इतिहासा  विचारा

हेमंत मुसरीफ पुणे 

  9730306996

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here