उरण दि 12(विठ्ठल ममताबादे ) : दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील उरण तालुक्यातील चिरले येथील भाजप जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरत यांच्या निवासस्थानी शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी साई कृपा मित्र मंडळ अध्यक्ष संतोष भगत, काँग्रेसचे रायगड जिल्हा सरचिटणीस रामनाथ पंडित,राष्ट्रवादी उरण तालुका सचिव नामदेव मढवी, अनंत ठाकूर, सुनील पाटील, एकनाथ ठाकूर, शंकर पाटील, संजय घरत, सागर घरत, शिवदास घरत, चंदन भगत, प्रवीण घरत, संजय मुंबईकर (वेश्वी), दिव्यांक घरत, सर्वेश घरत, हरिभाऊ म्हात्रे, (जासई), संभा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत नीलकंठ घरत यांच्या निवासस्थानी शिवजयंती साजरी केली.