उरण तालुका काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.

0

उरण दि 12(विठ्ठल ममताबादे )काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष  महेंद्र घरत, रायगड जिल्हा निरिक्षक श्रीमती चारुलता ताई टोकस, जिल्हा महिला अध्यक्षा श्रध्दाताई ठाकूर,उरण तालुका काँग्रेस महिला अध्यक्षा रेखा घरत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका काँग्रेस महिला उपाध्यक्षा पदी निर्मला ठाकूर,  उरण तालुका उपाध्यक्ष पदी अश्रया शिवकर, तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला सरचिटणीस पदी भारती कांबळे, उरण तालुका  महिला काँग्रेस कमिटीच्या महालन विभागीय अध्यक्षपदी योगसाधना पाटील यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नियुक्ती बद्दल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी जिल्हा महिला सरचिटणीस श्रीमती अमब्रिन मुकरी , जिल्हा चिटणीस नयनाताई घरत, तालुका महिला उपाध्यक्षा निर्मला पाटील, योगीता नाईक, विनया पाटील,योगिता नाईक, उपसरपंच सारिखा भोईर उपस्थित होत्या.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here