सातारा/अनिल वीर : मंगळवार पेठ,फलटण येथे कालकथीत नंदु आप्पा जगताप यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष (पुर्व विभाग) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सचिव स्वप्नील कांबळे, सुनील मसणे,दत्तात्रेय जगताप, संतोष जगताप, उमेश सावंत, फलटण तालुका रिपब्लिकन सेनचे नारायण पवार,संजय जगताप, दीलीप जगताप, सोमनाथ निकाळजे, नामदेव सोनवणे, ज्योती जगताप,शीतल जगताप. शोभा कांबळे. सुरेखा मसणे, मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.