सातारा/अनिल वीर : भारताला ज्याप्रमाणे फार मोठा प्राचीन इतिहास आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेला सुद्धा इतिहास आहे. इतिहास मार्गदर्शकाची काम करते.तेव्हा आधुनिक व नवीन इतिहास संशोधनावर निर्माण केला पाहिजे.असे प्रतिपादन डॉ.शशिकांत पवार यांनी यांनी केले.
येथील दीपलक्ष्मी पतसंस्था बुधवार पेठ शाखेचा २१ वा वर्धापन दिन व जागतिक महिला दिन सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तेव्हा डॉ.पवार मार्गदर्शन करीत होते.
अनुभव फिल्म क्लब यांच्या सहकार्याने अमेरिकेसारख्या प्रगत देशात घडलेल्या महान घटनेत अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कृष्णवर्णीय गणिततज्ञ महिलांच्या संघर्षमय जीवनावर दाखवण्यात येणारा चित्रपट “हिडन फिगर्स ” दाखविण्यात आला.सदरच्या कार्यक्रमास संदीप श्रोत्री,अक्षय गवळी, सागर पावसे, शिरीष चिटणीस,विनायक भोसले,सुनील बंबाडे,आग्नेश शिंदे, शुभम बल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. शशिकांत पवार म्हणाले सन १४५० मध्ये अमेरिका देश अस्तित्वात आला. तेव्हा कोलंबस याने आपल्या देशाच्या परवानगीने व्यापार व धर्म तसेच मसाल्यांच्या पदार्थांसाठी भारत देश नेमका जगाच्या नकाशावर कुठे आहे ? हे शोधण्यासाठी तो निघाला असता त्याला प्रथम प्रशांत महासागराच्या पलीकडचा अमेरिकेचा काट शोधला. ते तिथे ग्रुपने गेले. तेथील संपूर्ण प्रदेश हा डोंगराळ होता. त्या पुढील कालावधीत दोनशे वर्षानंतर ब्रिटन मधील लोकांच्या छळाला कंटाळून काही लोक इथे आली सन १६५० मध्ये त्यांनी कायदेशीर रित्या जागा निर्माण केल्या. शेतीच्या जागेसंबंधी
कडक नियम केले. त्याकाळी भांडवलदार व गुलामगिरी शाही अस्तित्वात असल्यामुळे तेथील ब्रिटिश नागरिकांनी सुरुवातीच्या काळी नावा चालवण्यासाठी व इतर कामे करण्यासाठी शेजारील आफ्रिकन देशातून निग्रो लोक आणले.त्यातूनच पुढे अमेरिका देश निर्माण होऊ लागला. या अमेरिकेत ५० देश निर्माण झाले. जस जसा देश मोठा होऊ लागला. तशी त्याची नगररचनाची निर्मिती होऊ लागली. अमेरिकेने धर्माला महत्त्व न देता देशाला महत्त्व दिले त्यातून अमेरिका निर्माण झाली. आज अमेरिका एक प्रगत राष्ट्र आहे. उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका असे दोन भाग पडले असून उत्तर अमेरिका यामधील नऊ श्रीमंत देश आहेत.दक्षिण अमेरिकेत निग्रो लोकांची व इतर जणांची गरीब राष्ट्र आहेत. यातूनच पुढे राष्ट्रीय, सामाजिक, संघर्ष अस्तित्वात आला. त्या संघर्षाला आणि अडचणींना कृष्णवर्णीय लोकांनी जो लढा दिला तो या “हिडन फिगर्स “मध्ये दाखवण्यात आला आहे.
शिरीष चिटणीस म्हणाले, “अमेरिकेमध्ये एका गोऱ्या व्यक्तीने निग्रो लोकांवर काय अत्याचार होतात.हे जाणून घेण्यासाठी स्वतःची सर्जरी करून त्यांनी अमेरिकेचे एक टोक ते दुसरे टोक या भागातील निग्रो लोकांचा अभ्यास करून त्यांच्या जीवनावर पुस्तक काढले.त्या पुस्तकाचे नाव “ब्लॅक लाईफ” होते. या पुस्तकात त्यांनी अमेरिकेतल्या चळवळीला जोर देण्यासाठी महत्वपूर्ण काम केले. त्याकाळी निग्रो लोकांसाठी वाशरूम, ट्रेन,बस, हॉटेल्स वेगळे होते. अशा वेळेस ते स्वतः गोरे असूनही सर्जरी केली असल्यामुळे ते व्हाईट लोकांच्या बाथरूम मध्ये जाऊ शकत नव्हते. तसेच त्यांनी जे इतर भोगले त्या अनुभवावर त्यांनी “ब्लॅक लाईफ” नावाचे पुस्तक लिहिले. त्या वेळेस अमेरिकेमध्ये अफरा तफरी माजली होती. त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला. त्यातून ते वाचले त्यांच्या फॅमिलीला परागंधा व्हावे लागले. इतकी वाईट परिस्थिती अमेरिकेत होती. सुदैवाने आपल्या देशात १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर हा गोरा तो काळा हा वर्णभेद जातीभेद या गोष्टी झालेल्या नाहीत.आपल्याला भारतीय म्हणून जे काय महत्त्व जगामध्ये मिळाले आहे त्याचे कौतुक करायला पाहिजे.
युरोपियन देशांना भारतामध्ये अनेक भाषा,जात,धर्म,पंथ लोक असल्यामुळे भारत कसं काय स्वतंत्र राष्ट्र होऊ शकेल ? असे नेहमी वाटत होते. या उलट युरोपियन राष्ट्रांमध्ये भाषा,जात, धर्म यावर देशांची निर्मिती झालेली होती. अशा भारतात
सन १८४७ साली भारतातील वैचारिक मंडळांनी आपण सर्वजण प्रथम भारतीय आहोत. हा जगाला फॉरमॅट दिला व जगाला भारताने आश्चर्यचकित केले.”
संदीप श्रोत्री म्हणाले, “हिडन फिगर्स” चित्रपटाने आपल्या डे टू डे लाइफ मधील आई, पत्नी बहीण व मुलगी यांना गृहीत धरले आहे.” अक्षय गवळी,सागर पावशे आदींनी मनोगत व्यक्त केली. राज भूषण सहस्त्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.