जुन्या पेन्शनबाबत सातारा प्राथमिक शिक्षक समितीने मानले आभार !

0

सातारा/अनिल वीर : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्वांनी मिळून संपामध्ये प्रत्यक्ष सहभाग दाखवलात. आजपर्यंत लढा यशस्वी करण्यासाठी ठाम राहिलात. अगदी पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत ज्या ज्या शिक्षक बांधवांनी लढ्यामध्ये सक्रिय  संप अर्ज भरून सहभाग घेतला त्या सर्वांचे मनापासून आभार प्राथमिक शिक्षक समितीच्या कार्यकारिणीने मानले आहे.

       याशिवाय, ज्यांनी ज्यांनी या लढ्याला बळ देण्यासाठी प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष आतुन बाहेरून पाठिंबा दिला होता.त्यांचेही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सातारा यांच्यावतीने आभार मानले आहे. संघटनेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ठाम राहिलात. त्यामुळेच आपल्याला यश मिळाले आहे.असे जाहीर तातोबा भिसे (अध्यक्ष),रविंद्र कुंभार (सरचिटणीस),प्रविण क्षीरसागर (कार्याध्यक्ष),सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here