उरण दि 6(विठ्ठल ममताबादे )कॉमेडी अभिनेत्री भाग्यश्री नरेंद्र घरत या नेहमी सामाजिक उपक्रम राबवित असतात.विदयार्थ्यांप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपत भाग्यश्री घरत यांनी उरण तालुक्यात सावरखार जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थ्यांना वही पेन्सिल खोडरबर, शॉपणर आदी शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप केले.विदयार्थ्यांना वस्तू मिळाल्याने सर्व विद्यार्थी आनंदात होते.
सावरखार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक महेश गावंड,शिक्षक अनिल म्हात्रे,कॉमेडी अभिनेत्री भाग्यश्री नरेंद्र घरत, कॉमेडी अभिनेता नरेंद्र घरत, प्रांजली घरत, जितेंद्र ठाकूर -माजी अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ सावरखार, सामाजिक कार्यकर्ते हसुराम घरत,चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास कडु यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.