विकासकामे गुणवत्तेत तातडीने पूर्ण करा

0

आ. आशुतोष काळेंच्या नगरपरिषद प्रशासन व ठेकेदारांना सूचना

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या विकासासाठी दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून कोपरगाव शहरातील २ कोटीची विकास कामे पूर्ण झाली असून उर्वरित विकास कामे गुणवत्तेत तातडीने पूर्ण करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासन व ठेकेदारांना दिल्या. कोपरगाव शहरात सुरु असलेल्या विकास कामांची पाहणी करून त्यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली याप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले की, वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत कोपरगाव प्रशासकीय इमारतीसाठी २ कोटीचा निधी दिला आहे. तसेच प्रशासकीय इमारती समोरील बगीचा सुशोभीकरणासाठी १ कोटी, वॉल कंपाऊंडसाठी ५० लाख निधी दिला आहे. तसेच धारणगाव रोडसाठी २ कोटी, बाजारतळ स्मशानभूमी व मोहिनीराजनगर येथील स्मशानभूमीसाठी ५० लाख रुपये निधी दिला आहे या कामांचा आढावा घेतला. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत विविध समाजाच्या सामाजिक सभागृहांसाठी दिलेल्या निधीतून सुरु असलेल्या कामांचा देखील आढावा आ. आशुतोष काळे यांनी यावेळी घेतला. त्याबाबत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सुरु असलेल्या विकासकामांची माहिती दिली. पावसाचे प्रमाण कमी झाले असून येत्या काही दिवसात पाऊस पूर्णपणे थांबणार आहे. त्यामुळे सुरु असलेल्या विकास कामात येणाऱ्या अडचणी यापुढे येणार नाहीत. विकास कामे करण्यासाठी दिलेल्या मुदतीत सुरु असलेली विकास कामे गुणवत्तेत व लवकरात लवकर पूर्ण होतील याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, रमेश गवळी, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, चंद्रशेखर म्हस्के, जावेद शेख, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, सुनील बोरा, आकाश डागा, इम्तियाज अत्तार, संतोष शेजवळ, मनोज नरोडे, राजेंद्र आभाळे, अक्षय आंग्रे, एकनाथ गंगूले, फिरोज पठाण, सचिन गवारे, शुभम लासुरे, निलेश राऊत, सागर लकारे, संतोष दळवी, युसूफ शेख, शिवाजी कुऱ्हाडे, प्रसाद उदावंत, कैलास मंजुळ, जुनेद शेख, मुकुंद भुतडा, श्रेणीक बोरा, विकी जोशी, आकाश गायकवाड, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, अभियंता सुनील ताजने, पर्वत सुराळकर, ठेकेदार सोमेश कायस्थ, संकेत वाणी आदी उपस्थित होते.

फोटो ओळ – कोपरगाव शहरात सुरु असलेल्या विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना करतांना आ.आशुतोष काळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here