वृद्धाश्रमात सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

0

सातारा/अनिल वीर : येथील आनंदाश्रम या वृद्धाश्रमात, “सुरसंगम सदाबहार नगमे” हा गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

 आश्रमातील सर्व वयोवृध्द मंडळी यामध्ये आनंदाने सहभागी झाली होती.त्यांनी नृत्यही केले.अतिशय आनंदात तीन तास कसे गेले ? हे कळलेही नाही.संचालिका  अंजली कुलकर्णी यांनी कौतुक केले.यावेळी खाऊ वाटपही करण्यात आले.बऱ्याच दिवसांनी त्यांनी एवढी मधुर गाणी ऐकली होती.यावेळी युनुस शेख, संजयकुमार परदेशी, विकास साबळे,संजय गोडसे, उर्मिला, संकेत शहा यांनी गाणी गायली व डान्सही केला. सूरसंगमतर्फे नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम सादर केले जातात.शहाबुद्दिन शेख यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here