इंदूरमध्ये मंदिरातील विहिरीवरील स्लॅब कोसळून १३ भाविक ठार !

0

इंदूर : मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये एका मंदिरात रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली. मंदिराच्या आवारात असलेल्या विहिरीचं स्लॅब कोसळलं आणि त्यात २५ हून अधिक भाविक पडले. सध्या बचावकार्य वेगानं सुरू आहे. यामध्ये आतपर्यंत १३ भाविकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही घटना इंदूरच्या बेलेश्वर महादेव मंदिरात घडली आहे. मंदिरातील कार्यक्रमासाठी आलेले लोक विहिरीच्या स्लॅबवर बसले होते. त्यावेळी त्यांच्या वजनानं हे छत कोसळलं आणि लोक त्यात पडले.
राज्य सरकारनं तातडीनं इथं बाचवकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा वर पोहोचला आहे.

जिल्हा प्रशासन, पोलीस आणि नगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या तरी नेमके किती लोक या विहिरीमध्ये अडकले आहेत याची माहिती देण्यास प्रशासनानं नकार दिला आहे. लोकांना वाचवणं ही त्यांची प्राथमिकता असल्याचं त्यांनी म्हटलंय. सध्या घटनास्थळी अफरातफरीची स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here