महावितरणकडून 10 हजार 376 शेतकऱ्यांच्या शेती पंपांना विद्युत पुरवठा

0

 

सातारा, दि. 29 :- शेतकऱ्यांच्या शेतासाठी सिंचनाची सोय असल्यास शेतकरी विविध पिके घेऊन आर्थिक उन्नती साधू शकतो. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महावितरणच्या अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील यंत्रणांना शेती पंप जोडणीबाबत कालब्द्ध कार्यक्रम आखून दिला. याची फलश्रृती म्हणून सन 2022-2023 या आर्थिक वर्षात 10 हजार 376 शेतकऱ्यांच्या शेती पंपांना विद्युत पुरवठा करण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या विकासाबाबत होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीमध्ये शेती पंप ग्राहकांना विद्युत पुरवठा करण्याबाबतचा नेहमीच प्रश्न उपस्थित केला जात होता. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणने  या आर्थिक वर्षात ठळक असे काम केले आहे.

कृषी धोरण-2020 अंतर्गत 9 हजार 150 शेतकऱ्यांच्या शेती पंपांस विद्युत पुरवठा करण्यात आला आहे, डी.डी.एफ. योजनेंतर्गत 455, नॉन डी.डी.एफ. योजनेंतर्गत 367, जिल्हा वार्षिक योजना व विशेष घटक योजनेंतर्गत 199 शेतकऱ्यांच्या शेती पंपांना विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. महावितरणचा नेहमीच शेतकऱ्यांना सौर कृषि पंप घेण्याचा आग्रह राहिला आहे. जिल्ह्यातील 205 शेतकऱ्यांनाही सौर कृषि पंपांचा लाभ देण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here