सिन्नर /नाशिक : संप काळातील शिक्षकांचे पगार नियमीत करा . अशी मागणी नाशिक मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी . देशमुख यांनी शासनाकडे केली आहे. आपल्या निवेदनात देशमुख यांनी म्हटले आहे की संप करणे हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा संविधानिक हक्क आहे. ज्यावेळेस ज्या कर्मचाऱ्यावर अन्याय होतो त्यांनी संयुक्तरित्या आवाज उठवणे एक क्रमप्राप्त आहे . पण तो आवाज जाचक कायदे करून दडपून टाकणे हे शासनाला शोभा देणारे नाही. नवीन पेन्शन योजनेमधील अधिकाधिक रक्कम जेव्हा शेअर्स मार्केटमध्ये गुंतवली गेली. त्यातून शून्य रिटर्न्स मिळाले. उलट गुंतवलेली रक्कम सुद्धा भरोसा राहिला नाही. सुरक्षिततेचे सगळे मार्ग उध्वस्त झाले. त्यावेळेस लोक रस्त्यावर उतरले. या सर्व गोष्टींसाठी जी परिस्थिती निर्माण झाली ,त्यातून संप करण्याची गरज पडली. संप लोकांनी विनाकारण किंवा हौस म्हणून केलेला नाही. काळजावर दगड ठेवून लोक संपात उतरले. त्यात लोकांचे पगार बंद केले गेले. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचा आवाज दाबून कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्यास आणखी मोठ्या स्वरूपामध्ये उठाव होऊ शकतो असा इशारा देशमुख यांनी दिला आहे . शासनाने नवीन पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करावी. संप काळातील पगार नियमित करावा. कर्मचाऱ्यांना पुन्हा संपावर जाण्याची वेळ येऊ नये अशी मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शासनाकडे मागणी आहे.