राहुरी तालूक्यात विनापरवाना घोडा बैल शर्यत ; तीन जणांवर गुन्हा दाखल

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :

               राहुरी तालूक्यातील तमनर आखाडा येथे मळगंगा देवी यात्रे निमित्त परवानगी न घेता घोडा बैल शर्यत भरविण्यात आली होती. पोलिस पथकाला खबर मिळताच त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्यात आली. घोडा बैल शर्यत भरवीणा-या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

               राहुरी तालूक्यातील तमनर आखाडा येथे दिनांक ३० मार्च रोजी मळगंगा देवीचा यात्रा उत्सव होता. या यात्रा उत्सवात काही जणांनी परवानगी न घेता घोडा बैल शर्यत भरवीली होती. या घटनेची खबर पोलिस निरीक्षक मेघःशाम डांगे यांना मिळताच त्यांनी पोलिस शिपाई दादासाहेब रोहकले व प्रवीण आहिरे यांना पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानूसार पोलिस पथकाने तमनर आखाडा येथे जाऊन शर्यत भरवीण्यास मज्जाव केला. तेथे प्रचंड गर्दी असल्याने पोलिस पथकाचे न ऐकता शर्यत भरवीण्यात आली. त्या ठिकाणी तीस ते चाळीस बैलगाडा धारकांच्या मदतीने घोडे, बैलगाडा हारजित ची शर्यत लावून गाड्यांना जुंपलेले घोडे व बैल अधिक वेगाने पळावे, याकरीता त्यांना चाबकाने क्रुरपणे मारहाण करण्यात आल्याचे दिसून आले. 

            कोणतीही परवानगी न घेता घोडा बैलाची हारजीत ची शर्यत भरवून प्राण्यांचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पोलिस नाईक दादासाहेब दत्तात्रय रोहकले यांच्या फिर्यादीवरून आरोपी १) दिलीप पंढरीनाथ तमनर २) अशोक हरिभाऊ तमनर ३) बापु रघुनाथ तमनर तिघे राहणार तमनर आखाडा, ता. राहुरी. यांच्यावर गुन्हा रजि. नं. ३४४/२०२३ भादंवि कलम १८८ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघःशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here