नवीन प्रभाग क्र.२ मधील विकासकामांसाठी स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे १ कोटी ४३ लक्ष ३० हजार रुपये मंजूर

0

कोपरगाव : माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगाव शहरातील विविध विकासकामांसाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हा स्तर), साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना, नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना अशा वेगवेगळ्या योजनांतर्गत ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये एवढा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. यामध्ये नवीन प्रभाग क्र.२ साठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत १ कोटी ४३ लक्ष ३० हजार रुपये निधी मंजूर झाला असून, त्यातून या प्रभागात रस्ते, पूल अशी विविध कामे होणार आहेत. या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. 

नवीन प्रभाग क्र.२ मधील वेगवेगळ्या विकासकामांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांचे माजी नगरसेविका ताराबाई गणपतराव जपे व माजी नगरसेवक संजय कारभारी पवार यांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत नवीन प्रभाग क्र.२ मध्ये सुखशांतीनगरमधील चारीवर पुलाचे बांधकाम करणे (४०,३२,७०० रुपये) व समतानगर भाग अंतर्गत लोखंडे यांचे घर ते साईसिटी चरापर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (२९,९९,४५४ रुपये), समतानगर अंतर्गत खडीकरण (१४,८५,००० रुपये), समतानगर अंतर्गत भुयारी गटार बांधकाम करणे (३१,६९,६०० रुपये), समतानगर भाग अंतर्गत लोखंडे यांचे घर ते साई सिटीपर्यंत भुयारी गटार बांधकाम करणे (१२,२९,२०० रुपये), महाजन गोठा-गायकवाड-जगताप-कुदळे यांचे घर रस्ता काँक्रिटीकरण करणे (१४,१३,६०० रुपये) ही कामे करण्यात येणार आहेत.  

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्तेवर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गतिमान सरकार जनहिताला प्राधान्य देत वेगवान पद्धतीने काम करत असून, या सरकारने जनतेसाठी अनेक कल्याणकारी निर्णय आजवर घेतले आहेत. गेल्या साडेतीन वर्षांत कोपरगाव शहरात एकही ठोस विकासकाम झालेले नाही. शहरातील विविध भागातील नागरिकांना रस्ते, पाणी, आरोग्य, गटारी आदी समस्यांना तोंड द्यावे लागत असून, विद्यमान आमदार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेककोल्हे यांच्याकडे विविध प्रश्न सोडविण्याबाबत विनंती केली होती. त्यावर स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी राज्याचे महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील विविध मुख्य डांबरी रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण, अतिमहत्त्वाचे तीन पूल, अंतर्गत रस्ते, गटारीचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक आदी विविध कामांसाठी निधी द्यावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून जिल्हा स्तर योजनांमधून कोपरगाव शहरातील विविध विकासकामांसाठी ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये इतका विक्रमी निधी मंजूर झाला आहे. विद्यमान आमदारांच्या निष्क्रियतेमुळे कोपरगाव शहरातील पाणी, रस्ते, आरोग्य, वीज आदी समस्या गंभीर बनल्या असताना दुसरीकडे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच शहरातील विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे शहरातील विविध विकासकामांकरिता ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपयांचा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विविध कामे मार्गी लागणार असल्यामुळे नागरिक स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांना धन्यवाद देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here