नाशिक : नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने काल विभागीय उपसंचालक कार्यालयात विभागीय उपसंचालक डॉ श्री बी बी चव्हाण साहेब व मुख्याध्यापक संघ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती .या वेळी प्रास्ताविक मुख्याध्यापक संघ सचिव एस बी देशमुख यांनी केले. त्यावेळी त्यांनी सरकारने जाहीर केलेल्या अनुदानित शाळा निकष 20%/40%/60%/ यामधील अटी शिथिल कराव्यात यात प्रामुख्याने आधार अपडेट करतांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मुदत वाढ देणे तसेच वेतन पथक कार्यालयात पेंडिंग असलेली विविध बिले तात्काळ मिळावी यासारख्या मागण्या मांडल्या.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्रदिप सांगळे यांनी आधार अपडेट करतांना येणाऱ्या विविध अडचणींचा पाडा वाचला विषेश करून परप्रांतीय विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करताना अनेक अडचणी येत आहे. त्यावर स्वतः उपसंचालक डॉ बी बी चव्हाण यांनी स्वतः विद्यालयाला भेट देऊन समस्या जाणून घेण्याचे आश्वासन दिले. तसेच शहर कार्यवाह यांनी आधार व युडायस साईड गेल्या आठ दिवसा पासून व्यवस्थित चालत नाही त्यामुळे काम होत नाही. त्यामुळे सदर कामास मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली. यावेळी अनेक मुख्याध्यापक यांनी विविध मागण्या केल्या त्यात संप काळातील पगार न कापणे, वेतन पथकातील विविध बिले एप्रिल मध्ये मिळावी .यासह विविध मागण्याचे निवेदन शिक्षण उपसंचालक डाँ . बी . बी . चव्हाण व सहाय्यक संचालक एल . डी . सोनवणे यांना देण्यात आले . या वेळे नुकतेच वर्धा येथुन बदली करून आलेले व नव्याने सहाय्यक संचालक पदावर रुजु झालेले एल . डी . सोनवणे यांचा मुख्याध्यापक संघाच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला .
यावेळी मुख्याध्यापक संघ अध्यक्ष एक के सावंत, सचिव एस बी देशमुख,उपाध्यक्ष प्रदिप सांगळे, पुरुषोत्तम रकीबे,श्री बी के नागरे शहर कार्यवाह शरद गिते बी के गांगुर्डे, इरफान शेख ,के डी देवढे व इतर