रेल्वे ओव्हरब्रीज परिसरात रात्री होणाऱ्या लुटमार व मारहाणीच्या निषेधार्थ शिवसेना महीला आघाडीचे निवेदन

0

मनमाड : मनमाड शहराच्या मधून जाणारा मनमाड नगर रोडवरील रेल्वे ओव्हरब्रीज जवळील (I W) ऑफिस समोरील मातोभी रमाबाई नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री ८.३० – ९.०० वाजेनंतर सर्रासपणे लुटमार, हाणामारी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. काही घटनांच्या तक्रारी पोलीस स्टेशनपर्यंत येतात परंतु अशा अनेक घटना ह्या भितीपोटी, लाजेपोटी महिलावर्ग दंडवत आहेत तसेच बरेच प्रवासी असल्याने ह्या घटना उजेडात माही परंतु ह्या प्रकारामुळे त्या रस्त्याने जाणाऱ्या लोकांमध्ये, प्रवाशामध्ये, प्रचंड घबराट पसरत आहे.

रविवार रोजी अश्याच एका घटनेत संदीप रोकडे ह्या ४० वर्षाचा इसम हा लुटीमारीनंतर झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन नासिक सिव्हील हॉस्पिटलला मृत्यूशी झुंज देत आहे. त्यापूर्वी २ दिवसापूर्वी मीरा मुरलीधर केदारे ह्या महिलेची चेन्स नॉचिंग झाली तत्पूर्वी तिला छेडछाड करून गुडघ्यावर मारहाण आली सदरील महिलेनी जीवाच्या आकांताने पळून आपली इज्जत वाचवली. त्यापूर्वी बिंदू अंकुश पांडे या महिलेचे पैसे हिसकावूत मारहाण करण्यात आली. ह्या प्रसंगी तपासातून काही संशयित पकडल्याचीहि माहिती मिळाली परंतु त्यापुढील कार्यवाही झाल्याचे समजले नाही.

या सर्व घटना वारंवार घडत असून त्यामुळे आरोपी हे निर्दाबल्याने सराईत हे प्रकार करत आहेत. तरी ह्या सर्व प्रकारामध्ये आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन अटकाव करावा व गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही व्हावी म्हणजे ह्या घटनांना आळा बसेल, व महिलावर्ग निश्चितपणे या रस्त्याने जाऊ शकतील. असे निवेदन शिवसेना महिला आघाडी तर्फे देण्यात आले.

         या प्रसंगी शिवसेना शहराध्यक्ष मयूर बोरसे, बाबा पठाण शिवसेना महिला आघाडी शहराध्यक्ष संगीता बागूल, कल्पना दोंदे, पूजा छाजेड, सुरेखा ढाके, नीता लोंढे अलका कुमावत,  प्रतिभा अहिरे,  संगीता गोडेराव, संगीता सांगळे, नीता परदेशी आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here