आता पुरुष बचत गटाला शासनाचे लाभ

0

देवळालीप्रवरा / प्रतिनिधी :

                 सर्वांनी एकत्र येऊन स्वतःचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,बचत गटाच्या माध्यमातून हे सहज शक्य असून पुरुष बचत गटाच्या सदस्यांसाठी नगरपरिषदेच्या वतीने शासनाच्या विविध योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन  देवळालीप्रवरा नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक यांनी केले.

         देवळालीप्रवरा नगरपरिषदेच्या दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान च्या वतीने स्थापन केलेल्या तावरे वस्ती येथील जय हनुमान पुरुष बचत गटाच्या बोर्ड अनावरण प्रसंगी जवक बोलत होते.

           यावेळी सुदर्शन जवक यांनी बोलताना सांगितले की, दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचा पुरुष गटांनी लाभ घ्यावा.नगर पालिकेच्या वतीने पुरुष गटांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येईल असे जवक यांनी सांगितले

          यावेळी साहय्यक प्रकल्प अधिकारी गोसावी यांनी सांगितले की,   ‘बचत गटाने आपले व्यवहार चोखं ठेवल्यास शासनाच्या वतीने व बँकेच्या सहकार्याने विविध योजना चा लाभ घेता येतो, त्यासाठी बचत गटाने आपली पत तयार होण्यासाठी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन गोसावी यांनी केले.

                  यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी, लेखाधिकारी कपिल भावसार, परिसरातील ज्येष्ठ नागरिक रामराव तावरे,  सचिव दिगंबर तावरे यांनी बचत गटाची माहिती दिली. तर शेवटी भगवान तावरे यांनी आभार मानले. यावेळी प्रविण तावरे, अनिल तावरे, विष्णु विधाटे, चांगदेव तावरे, प्रशांत डोले, सोमनाथ गवळी, केशव तावरे यांच्यासह परिसरातील महिला बचत गटांच्या सदस्या उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी समुदाय संघटक सविता हारदे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जय हनुमान पुरुष बचत गटाचे अध्यक्ष नामदेव साळुंके यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here