उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )
द्रोणागिरी नवी मुंबई येथे येत्या तीन वर्षात शंभर इमारती बांधण्याचा संकल्प केलेल्या आई इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सेक्टर ५२, प्लॉट नंबर १८, द्रोणागिरी येथे सात मजली साई स्वामी या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उद्घाटक ॲड.रत्नदीप पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे प्रदीप पाटील, आर के म्हात्रे, जीवन गावंड, सरपंच रमाकांत जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आई इन्फ्रा कंपनीचे सर्वेसर्वा नरसू पाटील यांनी अथक परिश्रम व मेहनत घेऊन बांधकाम क्षेत्रात आई इन्फ्रा कंपनीच्या द्रोणागिरीत नवी मुंबई मध्ये १४ इमारती, गोव्यात ७ व निपाणीत मॉल चे काम चालू आहे. अशा तीन राज्यात यशस्वी गरुड भरारी घेतली आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. नरसू पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी असेच जिद्दीने व प्रामाणिकपणे कार्य चालू ठेवले तर आई इन्फ्रा कंपनी ही येत्या काही वर्षात नवी मुंबईत टॉपची कंपनी होणारच. माझ्याकडून त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो असे विचार ॲड.रत्नदीप पाटील यांनी आपल्या भाषणातून मांडले. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी नरसू पाटील आणि आई इन्फ्रा कंपनीच्या कार्याचा गौरव आपल्या मनोगतातून व्यक्त केला. साई स्वामी इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आई इन्फ्राचे फ्लॅटधारक व गाळाधारक व नवी मुंबई परिसरातील निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.