मुद्यादेमाल सापडल्यावर तीघा जणांवर चोरीचा गुन्हा दाखल देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालूक्यातील कोल्हार खुर्द येथे घरासमोरील अंगणात ठेवलेली इन्व्हर्टरची बँटरी रात्री चोरून नेवुन भंगार दुकानदारास विकली. बॅटरीचा शोध घेतला असता ती बॅटरी राहता तालूक्यातील कोल्हार बुद्रुक येथील भंगारच्या दुकानात मिळून आली. मुद्यादेमाल सापडल्यावर तीघा जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.माञ चोरीचा माल विकत घेणाऱ्या विरुद्ध माञ कोणता हि गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
याबाबत मिळालेली माहिती सदानंद रेवन्नाथ शिरसाठ, वय ४५ वर्षे, रा. कोल्हार खु. ता. राहुरी हे राञी घराची साफ सफाई करत असतांना घरातील इन्व्हर्टर ची बटरी घरासमोर ठेवलेली होती. सकाळी उठल्यावर बॅटरी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.सदानंद शिरसाठ यांनी बॅटरीचा आजुबाजुला शोध घेतला असता ती बॅटरी राहता तालूक्यातील कोल्हार बु. येथील शांतीलाल भगवानदास सुराणा येथील भंगाराचे दुकानात मिळुन आली. तेव्हा त्यांना बॅटरी बाबत विचारले असता शांतीलाल सुराना यांनी सांगीतले की, आम्हाला ही बॅटरी कोल्हार खु. ता. राहुरी येथील सुरेंद्र उर्फ चिंग्या पावलस भोसले व त्यांचे दोन साथीदार विकली आहे. सदानंद रेवन्नाथ शिरसाठ यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुरेंद्र उर्फ चिंग्या पावलस भोसले रा. कोल्हार खुर्द व इतर दोन अनोळखीचे तरुण अशा तिघां जणांवर गुन्हा रजि. नं. ३५६/२०२३ भादंवि कलम ३७९, ३४ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल करण्यापुर्वी भंगार दुकानाचे मालक शांतीलाल सुराना यांना पोलिस ठाण्यात बोलावुन चौकशी केली की आर्थिक तडजोड करुन गुन्ह्यातुन वगळले आहे.
या घटनेत चोरीचा माल घेणारे भंगार मालाचे व्यापारी शांतीलाल भगवानदास सुराणा यांना देखील आरोपी करणे अनिवार्य होते. मात्र या गुन्ह्यात त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.हि विशेष घटना राहुरी पोलिस ठाण्यात घडली आहे.