पैठण,दिं.११ : पोलिस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर व छत्रपती संभाजीनगर ग्रामीण वाहतूक शाखा व पोलिस स्टेशन पैठण अंतर्गत काळी पिवळी वाहन चालक व खाजगी वाहन अॅपे रिक्षा चालक यांची मोफत नेत्र तपासणी शिबिर आय केअर नेत्रालय पैठण येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी काळी पिवळी व अॅपे असे एकूण दिडशे वाहन चालकांच्या डोळ्यांची तपासणी नेत्र तज्ञ डॉ. पांडुरंग मोरे यांनी केली. यावेळी मोफत चष्मे वाटप करण्यात आले. सदरील नेत्र तपासणी शिबिर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, पैठण उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली तर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर पवार, पैठण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलिस उपनिरीक्षक मधुकर गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी पैठण वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार सुधीर वाव्हूळ, मुकुंद नाईक, कल्याण ढाकणे, भाऊसाहेब वैद्य सह पोलीस कर्मचारी, काळी पिवळी, अॅपे रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.