सातारा/अनिल वीर : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दि.१५ रोजी सायंकाळी ७ वा. मेंढोशी येथे परिसरातील ग्रामपंचायतींना भारतीय संविधान प्रत भेट देण्यात येणार आहे.
मेंढोशी ता.पाटण येथील मेंढोशीसह सूरुल,बिबी, साखरी, केरळ, मणदुरे व निवकणे या पंचक्रोशीतील गावातील ग्राम पंचायतींना संविधानाची प्रत प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचनही करण्यात येणार आहे.
रात्री १०.०० वा.’गर्जतो सिंह सह्याद्रीचा’ आणि ‘सूर हा क्रांतिसूर्याचा’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.तेव्हा कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे. असे आवाहन संयोजकातर्फे राजेंद्र सत्वधीर यांनी केले आहे.