शिष्यवृत्तीसाठी लोधवडे प्राथमिकचा विराज कडाळे प्रथम तर कु.वैष्णवी अवघडे द्वितीय क्रमांकाची मानकरी

0
छाया - बक्षीस आणि पारितोषिक वितरण करताना जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी,मा.विकास सावंत, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे,समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे,शिक्षणाधिकारी शबनम मुजावर,यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक.

गोंदवले –  जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग सातारा यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त जिल्ह्यातील मागासवर्गीय पात्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना नुकतेच गौरविण्यात आले.

     यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श गाव लोधवडे ता.माण जि.सातारा येथील प्राथमिक शाळेतून गत वर्षी इयत्ता सातवीतून उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनातून विराज निवास कडाळे याची प्रथम क्रमांकासाठी तर कुमारी वैष्णवी जालिंदर अवघडे हिची द्वितीय क्रमांकाच्या शिष्यवृत्तीसाठी माण तालुक्यातून निवड झाली.अशा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून निवड झालेल्या प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मानकरी विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते ट्रॉफी,प्रशस्तीपत्रक आणि गुलाब पुष्प  देऊन गौरविण्यात आले.

      या सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा.विकास सावंत,उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अर्चना वाघमळे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा.सपना घोळवे,जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.शबनम मुजावर,व्याख्याते मा.प्रा.प्रकाश कांबळे,प्राथमिक जिल्हा उपशिक्षणाधिकारी मा.धनंजय चोपडे,  मा.हेमंतकुमार खाडे,विस्ताराधिकारी वनिता मोरे, विशाल कुमठेकर तसेच मार्गदर्शक शिक्षक सतेशकुमार माळवे सर,दिपक कदम सर,पालक निवास कडाळे,श्रीमंत अवघडे आदिंच्या उपस्थितीत हा बक्षीस आणि पारितोषिक वितरणाचा सोहळा संपन्न झाला.

      यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मा.ज्ञानेश्वर खिलारी आणि ज्ञानसूर्य व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावरील व्याख्याते मा. प्रा. प्रकाश कांबळे या प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी मा.शबनम मुजावर मॅडम यांनी केले,तर सूत्रसंचलन व स्वागत चव्हाण मॅडम यांनी केले.तसेच  उपशिक्षणाधिकारी मा.धनंजय चोपडे साहेब यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

      मुख्याध्यापक दिपक ढोक, शिक्षक दिपक कदम,सतेशकुमार माळवे,संतराम पवार,सुचिता माळवे,दिपाली फरांदे या शिक्षकांचे आणि विराज कडाळे व वैष्णवी अवघडे या यशस्वी विद्यार्थ्यांनाचे कोकण विभागाचे माजी आयुक्त मा.प्रभाकर देशमुख,पुणे अप्पर जिल्हाधिकारी मा.विजयसिंह देशमुख,डी वाय एस पी मा.चैतन्य कदम, गटविकासाधिकारी मा.सर्जेराव पाटील,उद्योगपती मा.रामदास माने, मा.अनुराधा देशमुख व हर्षदा जाधव ,माणचे ग.शि.मा.माणिक राऊत,अधिव्याख्याता मा.प्रा.विजय कोकरे, शिक्षण विस्ताराधिकारी मा.रमेश गंबरे ,लक्ष्मण पिसे,सोनाली विभूते, केंदप्रमुख मा.नारायण आवळे, मा.अशोक गंबरे ,अंकुश शिंदे, बाळासाहेब पवार,सरपंच मा.निवास काटकर, उपसरपंच मा.वैशाली देशमुख व सर्व ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी चेअरमन बापूराव पवार आणि सर्व सदस्य,पतसंस्थेचे चेअरमन विजय माने,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.राजकुमार माने आणि सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,ग्रामसेवक भीमराव टिळेकर,माजी सरपंच दिलीप चव्हाण,दादासो चोपडे,वैभव मोरे,शंकर देशमुख,अमोलसिंह जाधव,लक्ष्मण पवार,दादासो चव्हाण,शशिकांत देशमुख,पोलीस पाटील अनिल लोखंडे,अशोक पवार,मुगुटराव जगताप,त्रिवेणी मोरे,प्रा.इंद्रजीत ऐवळे,सोपान जाधव , रामदास जाधव ,पोपट जाधव व बबन जाधवआदि मान्यवर तसेच लोधवडे गावातील अनेक युवा आणि क्रीडा मंडळे,बहुसंख्य ग्रामस्थ आणि पालकवर्ग हे सध्याला यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कामगिरीबद्दल  त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.

छाया – बक्षीस आणि पारितोषिक वितरण करताना जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी,मा.विकास सावंत, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे,समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे,शिक्षणाधिकारी शबनम मुजावर,यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here