राहुरी पोलिस ठाण्यात दोन जणा विरोधात चोरीचा गुन्हा दाखल
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
ज्या हाॅटेल मालकाने रोजी रोटी दिली.त्याच हाँटेल मध्ये काम करता करता दोन कामगारांनी चोरी करण्याचा प्लँन केला.पहाटच्या दरम्यान या दोन कामगारांनी हाॅटेलच्या खिडकीची काच फोडून रोख रक्कमेसह विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण ४६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल चोरताना सीसीटिव्हीत कैद झाले. हि घटना राहुरी शहर हद्दीतील ग्रीन हॉटेल येथे घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,राहुरी शहरात नगर मनमाड राज्य महामार्गावर पाण्याच्या टाकीजवळ ग्रीन हॉटेल आहे. त्या ठिकाणी आदेश योसेफ जाधव, रा. बिरोबा नगर, राहुरी. हा तरूण मॅनेजर म्हणून काम करतो. दिनांक १९ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आदेश जाधव याने ग्रीन हॉटेल परमीट रुम अँण्ड लॉजींग येथील दिवस भराचा हिशोब केला. तेव्हा २५ हजार रुपए रोख रक्कम काऊंटर मध्ये ठेवली होती व काउंटर लॉक केले होते. त्यानंतर हॉटेलचे शटरला कुलुप लावून घरी गेला. त्यानंतर सकाळी आदेश जाधव हा ग्रीन हॉटेल येथे आला. तेव्हा हॉटेल मधील काउंटरचे ड्रावर उघडे दिसले व त्यातील २५ हजार रूपयांची रोख रक्कम तसेच हॉटेल मधील विदेशी दारुच्या बाटल्या दिसल्या असा एकूण ४६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याचे लक्षात आले.
हॉटेलचे मालक साहिल सतिष सोनवणे व माझ्या सोबत काम करणारा नितीन साळुंखे यांनी हाॅटेलमध्ये येऊन सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता दि. २० एप्रिल रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दोन इसम हे हॉटेल मधील कांऊटरचे ड्रावर मधुन पैसे चोरताना दिसले त्यातील दोन्ही इसम ग्रीन हॉटेल येथील कामगार असल्याचे लक्षात आले. या दोन्ही कामगारांनी हाॅटेलच्या खिडकीची काच फोडून आत प्रवेश करून चोरी केल्याचे दिसेल आले. आदेश योसेफ जाधव याच्या फिर्यादीवरून आरोपी १) विनायक गणपत बर्डे २) अर्जुन बर्डे, दोघे रा. बारगाव नांदुर, ता. राहुरी. या दोघांवर गुन्हा रजि. नं. ४१२/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास राहुरी पोलिस करीत आहे.