फलटण तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठबळ देणार. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. 

0

फलटण    :    

                    सातारा जिल्ह्यात आणि फलटण तालुक्यात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांना पाठबळ दिले जाईल असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सातारा जिल्हा काँग्रेसचे प्रभारी श्रीरंग चव्हाण पाटील हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना फलटण येथे आले होते. फलटण राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

                                   फलटण तालुका पूर्वी राष्ट्रीय काँग्रेसच्या विचाराचाच होता. तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसचे वर्चस्व  वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना पाठबळ दिले जाईल असे सांगत आपण लवकरच फलटण तालुक्याचा दौरा करणार असल्याचे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले. तर तालुक्यातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बळावर आपण ताकद निर्माण केली असून पक्षाच्या अस्तित्व टिकवून ठेवले आहे.. त्याला प्रदेश काँग्रेसने साथ द्यावी अशी मागणी  डॉ.. सचिन सूर्यवंशी यांनी यावेळी मांडली .  यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष पंकज पवार, कार्याध्यक्ष अमीर भाई शेख, जिल्हा सरचिटणीस शंकरराव लोखंडे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य कदम, जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम रणदिवे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, अशोकराव शिंदे, दीपक शिंदे आणि फलटण तालुका व शहर काँग्रेसचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते, 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here