धारणगाव, कुंभारीच्या मुस्लिम दफनभूमीचा प्रश्न आ. आशुतोष काळेंच्या पुढाकारातून मार्गी

0
फोटो ओळ- धारणगाव, कुंभारी दफनभूमी मंजुरी आदेश मुस्लीम बांधवांना देतांना आ. आशुतोष काळे समवेत तहसीलदार विजय बोरुडे

कोळपेवाडी वार्ताहर :- मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या धारणगाव, कुंभारीच्या मुस्लीम बांधवांची प्रमुख मागणी असलेला दफन भूमीचा प्रश्न प्रलंबित होता. त्याबाबत धारणगाव, कुंभारीच्या मुस्लीम बांधवांनी आ. आशुतोष काळे यांच्याकडे आपली अडचण मांडून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली होती. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी पुढाकार घेवून शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्यातून हा प्रश्न मार्गी लागला असून धारणगाव, कुंभारीच्या मुस्लीम बांधवांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

  मागील साडे तीन वर्षाच्या कार्यकाळात आ.आशुतोष काळे यांनी विकासाच्या प्रश्नांबरोबरच सर्व समाजाला समसमान न्याय देवून सर्वच समाजाचे महत्वाचे सामाजिक व धार्मिक प्रश्न मार्गी लावले असून मुस्लीम समाजाचे देखील दफनभूमी व कब्रस्तानचे प्रश्न सोडविले आहे. त्यामुळे धारणगाव, कुंभारीच्या मुस्लीम बांधवांनी देखील आ. आशुतोष काळे यांच्याकडे दफनभूमीचा प्रश्न मांडला असता हा प्रश्न देखील आ. आशुतोष काळे यांनी सोडविला आहे. त्याबाबतचे दफनभूमी मंजुरी आदेशांचे पत्र आ. आशुतोष काळे यांनी नुकतेच धारणगाव, कुंभारीच्या मुस्लीम बांधवांना सुपूर्त केले.

 माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमाणेच आ.आशुतोष काळे यांनी देखील मतदार संघातील मस्जिद, दफनभूमीसाठी मोठा निधी दिला आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या पवित्र रमजानच्या दिवशी देखील कोपरगाव शहरातील अक्सा मस्जिदमध्ये २५ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या सभामंडप बांधकाम व मस्जिद सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्याबरोबरच आमचा देखील मागील अनेक वर्षापासुनचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी अल्पकाळात सोडवून मुस्लीम बांधवांची मोठी अडचण व होणारी गैरसोय दूर केली आहे. त्यामुळे धारणगाव, कुंभारीच्या मुस्लीम बांधवांसह मतदार संघातील सर्व मुस्लीम बांधव नेहमीच आ. आशुतोष काळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशा भावना यावेळी मुस्लीम बांधवांनी व्यक्त केल्या.

यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी घुले, जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, संचालक नानासाहेब चौधरी, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन बापूराव जावळे, माजी नगरसेवक मंदार पहाडे, फकीर कुरेशी, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, शैलेश साबळे तसेच धारणगाव येथील मारुतीराव चौधरी, नानासाहेब दवंगे, साहेबलाल शेख, छबुराव थोरात, राजेंद्र जाधव, प्रसाद गिरमे, दत्तात्रय जोंधळे, अब्दुल पटेल, करीम पटेल, सद्दाम पटेल, हमीद शेख, नाजीम पटेल, अस्लम शेख, अमन पटेल, लियाकत पठाण, सलीम पटेल, शौकत पठाण, कलीम पटेल, अमीर पठाण, अकीलशेख, सलीम पठाण, लतीफ शेख, इस्माईल शेख, हसन शेख, राजु शेख, हुसेन शेख, शकील शेख, शाहरुखशेख, जुबेर शेख, अब्दुल शेख, समशेर शेख, आवेश शेख, राजु पठाण, कुंभारी येथील दिगंबर बढे, अण्णासाहेब बढे, प्रशांत घुले, लक्ष्मण बढे, दिनेश साळुंके, वसंत घुले, शमशुद्दीन शेख, चांदभाई शेख, शौकतशेख, सलीमशेख, बशीर शेख, इस्नार शेख, नूर शेख, दाऊद शेख, निजाम शेख, अहमद शेख, सुफीयान शेख, रज्जाक भाई शेख, शाहिद शेख, सादभाई शेख, शोएब शेख, राजु शेख आदींसह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here