संगमनेर : दूध संस्थेकडून ॲडव्हान्स घेऊन ती रक्कम दुधाच्या पगारातून संस्थेत जमा करील असा विश्वास संपादन करत मनोलीतील एकाने दूध संस्थेची सुमारे तीन लाख ७४ हजार ७३० रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी मनोली येथील एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मच्छिंद्र सुखदेव भागवत रा.मनोली यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की आरोपी संतोष सोपान शिंदे रा.मनोली याने दिनांक ३१ जानेवारी २०२० ते दिनांक ७ ऑक्टोबर २०२२ या दरम्यान संस्थेकडून ॲडव्हान्स घेऊन ती रक्कम संस्थेस दुधाचे पगारातून परत करीन असा विश्वास संपादन केला. या दरम्यान आरोपीने वेळोवेळी काही रक्कम भरली. मात्र बाकी राहिलेली तीन लाख ७४ हजार ७३० रुपये ही रक्कम फिर्यादीने आरोपीकडे वेळोवेळी संस्थेत भरण्यास सांगितली असता आरोपीने सदरची रक्कम संस्थेत भरण्यास नकार देऊन फिर्यादीची रक्कम स्वतःचे फायद्या करिता वापरून संस्थेचा विश्वासघात करून संस्थेची फसवणूक केली. याबाबत मच्छिंद्र सुखदेव भागवत यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी आरोपी संतोष सोपान शिंदे रा.मनोली याचे विरुद्ध गुन्हा रजि. नंबर ४२७ / २०२२ भा.द.वि कलम ४०६, ४२० प्रमाणे दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.घोडे करत आहेत.