संगमनेर : मेंढ्या धुण्यासाठी पाण्याच्या डोहावर गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला फाट्यावर काल बुधवारी (दि.२६) दुपारी ही घटना घडली.
याबाबतची माहिती अशी की, सोमनाथ कचरू जेडगुले (वय ३६) रा. धुळवाडची,डोंगराची वाडी, ता. सिन्नर, जिल्हा नाशिक आणि शुभम रावसाहेब कोटकर (वय २०) रा. पिंपळे, ता. संगमनेर हे दोघेजण काल बुधवारी दुपारी नांदुरी दुमाला शिवारातील नांदुरी फाटा येथे असलेल्या पाण्याच्या डोहावर मेंढ्या धुण्यासाठी गेले होते.ते दोघे मेंढ्या धुवत असताना डोहातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्या दोघांनाही पाण्याच्या बाहेर काढून उपचारासाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत मृत सोमनाथ जेडगुले यांचा मावस भाऊ विलास खंडू शिरतार रा. गोडसेवाडी, धांदरफळ, ता. संगमनेर यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घोडे अधिक तपास करत आहेत.