बहुतांश गावे मुख्य रस्त्यांना जोडल्यामुळे दळणवळणाच्या अडचणी सुटल्या :- आ. आशुतोष काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी दळणवळण सुविधेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांच्या विकासाबरोबरच या रस्त्यांना जोडणाऱ्या गावांतर्गत रस्त्यांचा विकास करून बहुतांश गावे मुख्य रस्त्यांना जोडल्यामुळे दळणवळणाच्या अडचणी सुटल्या असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.

 देर्डे कोऱ्हाळे येथे १० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या भगवान होन घर ते नानासाहेब शिंदे घर रस्ता खडीकरण कामाचा भूमिपूजन कार्यक्रम नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आजवर जवळपास २११ कोटी निधी आणला आहे. या निधीतून बहुतांश राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्गाचा विकास झाला असून गावापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.उर्वरित रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव शासनदरबारी सादर केलेले असून त्यांना देखील लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी देर्डे कोऱ्हाळे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विकास दिघे, शिवाजीराव शिंदे, शांताराम डूबे, सुभाष सावंत, अर्जुन दिघे, पांडुरंग दिघे, पांडुरंग विघे, योगीराज देशमुख, नरेंद्र देशमुख, दत्तात्रय डूबे, बाळासाहेब शिंदे, सुदाम शिंदे, गौतम विघे, राजु डूबे, काशिनाथ डूबे, कचेश्वर डूबे, राहुल डूबे, राजु दिघे, रविंद्र शिंदे, वाल्मिक डुबे, कैलास डूबे, भगवान डूबे, राधाकिसन डूबे, उमाकांत शिलेदार, अनिल डूबे, बाबासाहेब कोल्हे, कचेश्वर सावंत, अनिल शिलेदार, संदीप कोल्हे, एकनाथ शिंदे, दत्तात्रय जाधव, कैलास दिघे, बाळासाहेब वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता वर्षराज शिंदे, दिलीप गाडे, बाळासाहेब रुईकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here